वृक्षमित्र विक्की वांडे यांना ‘वृक्ष दिप’ पुरस्कार

रोहा : समीर बामुगडे 

प्रियांका प्लांट हाऊस चे मालक विक्की वांडे यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतेच  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते वृक्ष दिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय मानव विकास परिषद महाराष्ट्र व आदर्श मुंबई प्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या दहाव्या वर्धपन दिनाच्या प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार 2022 कार्यक्रमात प्रकृती, संस्कृती, अन्नदाता आणि जलविज्ञान वृक्ष दिप या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये प्रियांका प्लांट हाऊस चे मालक विक्की वांडे यांना वृक्ष दिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

प्रियांका प्लांट हाऊस चे मालक विक्की वांडे यांनी गेल्या आनेक वर्षांच्या कालावधीत ग्रीन व्हॅली  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा नवी मुंबईसह देश व विदेशातही उमटवला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे व  वृक्ष दिप पुरस्कार देण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचेअनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. रत्नाकर कुदळे, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक /अध्यक्ष श्री विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे, जया कुदळे मॅडम उपस्थित होत्या व यांच्या हस्ते वृक्षमित्र विक्की वांडे यांना वृक्ष दिप पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

Popular posts from this blog