उपसरपंचपदी रंजना राऊत बिनविरोध 

फटाक्यांच्या आताषबाजीत झाले स्वागत

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे ग्रा.पं.चे विद्यमान उपसरपंच मोहन नागोठणेकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर रंजना राऊत यांची नागोठणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच फटाक्यांच्या आताषबाजीने नवनिर्वाचित उपसरपंच रंजना राऊत यांचे स्वागत करण्यात आले.

येथील ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारी 2018 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत जनसेवा आघाडीला मिळालेल्या यशानंतर जनतेतून निवडून आलेले डॉ.मिलिंद धात्रक यांनी सरपंचपदाचा पदभार सोमवार 21 मे 2018 रोजी बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालयाच्या ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारला. त्यानंतर किशोर जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनसेवा आघाडीच्या सभेत ठरल्याप्रमाणे उपसरपंचपदासाठी पहिले सुप्रिया महाडीक,सुरेश जैन यांना प्रत्येकी दीड वर्षे तसेच मोहन नागोठणेकर व रंजना राऊत यांना प्रत्येकी एक वर्षे असे ठरल्यानुसार मोहन नागोठणेकर त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर बुधवार 08 जून रोजी दुपारी 3.00 वाजता सरपंच तथा निवडणूक अधिकारी डॉ. मिलिंद धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य- मोहन नागोठणेकर,सुरेश जैन,ज्ञानेश्वर साळुंखे,राजेश पिंपळे,सदस्या- सुप्रिया महाडीक,कल्पना टेमकर,भक्ति जाधव,मिनाक्षी गोरे,रूपाली कांबळे,माधवी महाडीक,मंगी कातकरी,ग्रामविस्तार अधिकारी मोहन देवकर यांच्या उपस्थितीत उपसरपंचपद निवडीसाठी झालेल्या सभेत रंजना राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी नेमणूक झाल्याचे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांनी जाहीर केले. उपसरपंचपदी रंजना राऊत यांची निवड झाल्याचे समजताच फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली असून आघाडीचे शिल्पकार शिवसेना सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कीशोर जैन,माजी पं.स.सदस्य बिलाल कुरेशी यांच्यासह दर्शना जवके,श्रेया कुंटे,दीप्ती दुर्गावले,धनंजय जगताप,विठ्ठल खंडागळे,लक्ष्मण राऊत,नामदेव चितळकर,सुनील राऊत,विनोद आंबडे,सिराज पानसरे,असपाक पानसरे,सद्दाम दफेदार,मोरेश्वर नागोठणेकर,पप्पू अधिकारी,प्रकाश कांबळे,ऋत्विक माने,योगेश म्हात्रे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी,खडक आळीतील ग्रामस्थ व महिलांसह विभागातील नागरिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 उपसरपंच पदासाठी सर्वांना प्राधान्य दिले - किशोर जैन

उपसरपंच पदी रंजना राऊत यांची निवड झाल्यानंतर किशोर जैन यांनी संगितले की, आघाडीत ठरल्याप्रमाणे प्रत्येक उपसरपंचांनी मुदतीपेक्षा चार दिवस आधीच राजीनामा दिले असून सर्वांच्या सहकार्याने हे पद कोणतेही भेदभाव न करता बिनविरोध निवडले गेले.या पदासाठी दोन तीन ट्रम निवडून आलेल्या सर्वांना प्राधान्य दिले असून ग्रा.प. मध्ये येणार्‍याची प्रत्येक कामे होत असून गेल्या चार वर्षात माझ्या मनातील रोल मॉडलचे काम प्रगति पथावर आहे. येणार्‍या वर्षात सर्वात महत्वाचा फिल्टर पाणी प्रश्न सोडविण्यात येईल.पाणी मिळायला पाहिजे म्हणून स्टॅण्डपोस्ट मार्फत सुरूवातीला फिल्टर पाणी देण्यात आले. सरकारने जाहीर केलेल्या घर घर मे जल ही योजनेचाही आराखडा तयार करण्याचे काम चालू झाले आहे. त्यानंतर बैठक होऊन लवकरच प्रत्येकाच्या घ्ररो घरी पाणी जाणार असल्याचे सांगून शहरासाठी जवळ जवळ सहा कोटी विकास कामांसाठी आलेला निधि व होणार्‍या कामांची माहिती किशोर जैन यांनी दिली.

Popular posts from this blog