ज्वाला ग्रुपच्या वतीने महापूजेचे आयोजन
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या मंदिरात शुक्रवार 17 जून रोजी ज्वाला ग्रुप,खडकआळी यांच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये शुक्रवारी सायं. 3.00 वाजता गणेश सहस्त्रबुद्धे या पौराणिकांच्या उपस्थितीत संकेत व सोनम बाकाडे या दापत्यांच्या शुभ हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. 7.00 ते 8.00 वाजता येथील श्री संत सेवा मंडळाचे हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. या महापूजेचा व तीर्थ प्रसादाचा लाभ विभागातील हजारो भाविकांनी घेतला. हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खडकआळी ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच ज्वाला ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.