यावर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्था चांगल्या नफ्यात - अध्यक्ष बाळासाहेब टके
प्रियदर्शनी वाहतूक संस्थेची 26 वी सर्व साधारण सभा संपन्न
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्था मर्यादित यांची 26 वी वार्षिक साधारण सभा शुक्रवार 24 जून रोजी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी संस्था आपल्या सर्वांच्या सहकार्याने नफ्यात असल्याची माहिती बाळासाहेब टके यांनी दिली. या सभेला संस्थेचे संस्थापक मारुती देवरे,सल्लागार समिती सदस्य भाई टके,उपाध्यक्ष झिमा कोकरे,माजी अध्यक्ष सिराज पानसरे,शिवराम शिंदे,हरिष काळे,लियाकत कडवेकर, शब्बीर पानसरे,सदानंद गायकर,चंद्रकांत जांबेकर,गुलाम हुसेन पाटणकर,गणपत म्हात्रे,खंडू ठाकूर,विठोबा दंत,प्रभाकर ठाकूर,संजय मोदी,अजय चंदने, सखाराम मोकल,रशिद दफेदार,शंकर ठाकुर,शैलेश रावकर,बाळा मढवी,जिना पोत्रिक,प्रथमेश काळे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक,सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप दुर्वे यांनी सन 2021-22 चा नफा तोटा पत्रक व ताळेबंद यांचे वाचन केले. आपल्या मनोगतात अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी या वर्षी आपली संस्था आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या नफ्यात असल्याचे सांगीतले.संस्था नफ्यात असल्याने सर्व संचालक मंडळ, सल्लागार समिती व कर्मचारी वर्ग यांचा अभिनंदनाचा ठराव हरिष काळे यांनी मांडला. शिवराम शिंदे यांनी सदरील संस्थेचा कारभार गेली अडीच वर्षे अध्यक्ष म्हणून सिराज पानसरे यांनी चांगल्या पध्दतीने काम करीत सांभाळला असून आताचे अध्यक्ष बाळासाहेब टकेही सर्वाच्या सहकार्याने उत्तम प्रकारे कामकाज चालवीत असल्याने समाधान व्यक्त केले.यावेळी मारुती देवरे,हरिष काळे,शब्बीर पानसरे यांनीही आपले विचार मांडले. सभासदांना पावसाळी हंगामात ट्रकसाठी ताडपत्री,दोर व इतर साहित्यांसाठी अनुदान देण्याचा ठराव भाई टके यांनी मांडला.याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. सदरील संस्थेची 26 वी सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडल्याची माहिती सिराज पानसरे यांनी दिली.