हात की सफाई; ट्रक मधून लाखो रुपये किंमतीच्या प्लास्टिक दाण्यांच्या बॅगा केल्या लंपास

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे सर्विस सेंटर या पेट्रोल पंपाच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ट्रक मधून पहाटे अज्ञात चोरट्यांनी 2,15,900/- किंमतीच्या 25 किलो वजनाच्या एलडीपीई व एलए या ग्रेडच्या 127 प्लास्टिक दाण्यांच्या बॅगा लंपास केल्या असून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागोठणे शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील मीरानगर येथील नागोठणे सर्विस सेंटर या पेट्रोल पंपामध्ये मंगळवार 28 जून रोजी सायंकाळी 6.45 ते बुधवार 29 जून रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या दरम्यान पार्क करून ठेवलेल्या ट्रक क्र. MH 06 K 3385 च्या मागील बाजूची ताडपत्री मध्यभागी फाडून अज्ञात चोरट्यांनी 2,15,900/- रुपये किंमत असलेल्या एलडीपीई 1070 व एलए 17 या ग्रेडच्या 25 किलो वजनाच्या एकुण 127 प्लास्टीक दाण्याच्या बॅगा लंपास केले असल्याची तक्रार ट्रक मालक राहुल दुबे यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात केली असून पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

Popular posts from this blog