ग्रामस्थ व महिला मंडळ खडकआळीच्या वतीने मान्यवरांचा नागरी सत्कार
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील खडक आळीतील ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ व ज्वाला ग्रुपच्या वतीने रविवार 26 जून रोजी स्वामी समर्थ मठ येथे मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रितेश दोशी,विठ्ठल खंडागळे,सुनील राऊत,अप्पा ठोंबरे, नाना वाळंज,मधूकर म्हसकर,सुधाकर शिर्के,भाऊ पिंपळे,रविंद्र राऊत,विजय पिंपळे,विजय खंडागळे,राजू जोशी,विनोद अंबाडे,बबली खंडागळे, सुरेश जोशी,नितीन राऊत, मनोहर सकपाळ,निलेश भोपी, अनिकेत ठोंबरे, संतोष जोशी, यशवंत तेलंगे,दिलीप मांडवकर,दिलीप तेलंगे,यश म्हात्रे,दिनेश ठोंबरे,विशाल खंडागळे, बाळा राऊत,संतोष राऊत,हरिष शिर्के,मनोज मांडवकर यांच्याह अनिता जोशी, स्वाती राऊत,अर्चना पिंपळे,संचिता ठोंबरे,शैला पाटील,चित्रा खंडागळे,मनीषा राऊत तसेच खडकआळी ग्रामस्थ, महिला वर्ग व ज्वाला ग्रुपचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडकआळी तर्फे करण्यात आलेल्या नागरी सत्कारामध्ये खडकआळीतील समाज मंदिराला मंजूरी मिळवून दिली तसेच आळीला 24 तास मुबलक पाणी पुरवठा केल्याबद्दल सरपंच डॉ. मिलिंद धात्रक,नवनिर्वाचीत उपसरपंच रंजना रवींद्र राऊत,नवनिर्वाचीत ग्रा.प.सदस्य राजेश पिंपळे तसेच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत को.ए.सो. अग्रवाल विद्यामंदिरात द्वितीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेली समृद्धी संतोष राऊत या सर्वांचा शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन नागरी सत्कार करण्यात आल्याची माहिती रविंद्र राऊत यांनी दिली.