नागोठणे नगरीत ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ व खाऊचे वाटप
नागोठणे : महेंद्र माने
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेनाप्रमुख ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विभागीय शिवसेना शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर येथील रुग्णालयातील रुग्णांना फळ व खाऊचे वाटप करून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिवसेना उपविभाग प्रमुख बळीराम बडे, शाखाप्रमुख धनंजय जगताप, उपशाखाप्रमुख बाळू रटाटे, शहर संपर्कप्रमुख अनिल महाडिक, युवासेना विभाग अधिकारी मंदार कोतवाल, युवासेना शाखाधिकारी दिनेश वादळ, युवासेना विभाग सरचिटणीस प्रणव रावकर,युवासेना शहर समन्वयक ऋत्विज माने यांच्यासह दत्ता कडव, सुदेश येरुणकर,रुपेश नागोठणेकर, जयेंद्र नागोठणेकर, निलेश भोपी, योगेश म्हात्रे, महेंद्र नागोठणेकर तसेच विभागातील शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.