मुरुड तालुक्यात विहुर जंगलपट्टयात होतेय अवैध खैरतोड!

३५ सेक्शनचे नियम धाब्यावर बसवून वनपाल आणि वनरक्षकाच्या आशिर्वादाने खैरतोड! 

रोहा : समीर बामुगडे 

मुरुड तालुक्यात अवैध वृक्षतोड होत असणाऱ्या परिसरातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकार आणि नोकरशाही यांच्या निष्क्रीय आणि ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेला रोज नव्या समस्यांना सोडवून घेण्यासाठी शासन दरबारी जायचे आणि दरबारातुन परतायचे असा अनुभव नागरिकंना आला आहे.

विहुर जंगलपट्टयात मोठया प्रमाणात खैराची झाडे आहेत. या खैराच्या लाकडाचा वापर कात करण्यासाठी केला जातो./काताला मोठी मागणी असते परिणामी साहजिकच खैराला मोठी किंमत मिळते. खैराचे व्यापरी आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यात साटेलोटे निर्माण झाल्याचे पहायला मिळते. त्यामुळे विहुर परिसरामध्ये खैराची अवैधपणे तोड सुरु असून तसेच ५ जुन नंतर वृक्षतोडी बंदी असताना एका व्यापाऱ्याने ३५ सेक्शनचे नियम धाब्यावर बसवून वनपाल व वनरक्षक यांना हाताशी धरून संगनमत केल्याचे बोलले जात आहे. या वनपालाची उच्चस्तरिय चौकशी करुन त्यांना ताक्तळ निलंबित करावे अशी मागणी परिसतील नागरिकांकडुन केली जात आहे.

विहुर बिटामध्ये ३५ सेक्शन तोडणाऱ्या व्यापाऱ्याला मदत करणाऱ्या वनपाल व वनरक्षक यांनी पदाचा गैरवापर केला जात आहे तर वनरक्षकच वनभक्षक बनलेत की काय? असा सवाल विहुर परिसरातुन होत आहे. तरी या प्रकरणात येथील वनपालाची चौकशी केली जाईल का? असा प्रश्नन नागरिकांकडुन उपस्थित केला आहे,

Popular posts from this blog