माणगांव पंचायत समितीवर दिव्यांगाचा संतप्त मोर्चा

माणगांव : पदमाकर उभारे

माणगांव पंचायत समितीवर १३ जून रोजी सकाळी ११ वा. माणगांव तालुक्यातील दिव्यांगानी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे माध्यमातून तिव्र आंदोलन केले. 

यावेळी कोकण विभागीय प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष सुरेश मोकल, रायगड जिल्हाध्यक्ष सुनिल घनमोडे , जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र सांगले, जिल्हा महिला अध्यक्ष रमाताई चौगले ,माणगांव प्रहार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आण्णा पांचाळ,उपाध्यक्ष नितेश मिरगुले, सचिव अमोल पांगारे, महिला अध्यक्ष रेश्मा मोरे, इंदापूर विभाग अध्यक्ष सुहास गंभीर तसेच अनेक पदाधिकारी व तालुक्यातील दिव्यांग पदाधीकारी उपस्थित होते.

माणगांव तालुक्यातील काही  ग्रामपंचायतीनी शासनाकडून येणारा ५% दिव्यांगाचा निधी वाटप केला जात नाही.तसेच ग्रामपचायती मध्ये असलेल्या विविध योजना सुद्धा दिव्यांगाना सांगत नाही.तसेच पाटणुस ग्रामपंचायत ही माणगांव तालुक्यातील एक श्रीमंत ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन पाटील यांनी पंधरा दिव्यांगाचा निधी अद्याप दिलेला नाही त्याना वेग वेगळे कारण सांगून उडवा उडवीचे उत्तरे देत असल्यामुळे माणगांव तालुक्यातील दिव्यांग आक्रमक झाले होते. 

माणगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. एम.प्रभे यांना अनेकवेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी  दखल घेतली नसल्याने गटविकास अधिकारी यांना दिव्यांग कार्यकर्ते यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला व  घेराव घातला. त्यावेळेस गटविकास अधिकारी यांना अनेक प्रश्न विचारले असता त्यांनी फक्त अश्वासन दिले की माणगांव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवक यांना आदेश देऊन दिव्यांगाचा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार. तसेच दिव्यांगाना कोणताही प्रकारे त्रास होणार नाहीअसे सांगितले.

यावेळी रायगड जिल्हा दिव्यांग महिला अध्यक्ष रमाताई चौगुले यांनी माध्यमाजवळ बोलताना सांगितले की माणगांव प स.चे गटविकास अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना सतत संपर्क  करून सुद्धा त्यांनी आद्याप दखल घेतली नसल्यामुळे आज आम्ही  धडक मोर्चाचे आयोजन केले.पाटणूस ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे दिव्यांगनाकडे शंभर रुपये बॉण्ड पेपरची मागणी करीत आहे.अशा ग्रामसेवक यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी दिव्यांगानी मागणी केली आहे.

हा दिव्यांगाचा मोर्चा चालू असतानाच माणगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभे हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.कु.अदिती तटकरे या गोरेगाव दौऱ्यात आलेल्या सांगून दिव्यांग मोर्चाला सामोरे गेले नाहीत . या मोर्चात सामील झालेल्या दिव्यांगाने  माणगांव तालुक्यातील आपल्याला दिव्यांगाना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण दिवसभर माणगांव पंचायत समिती कार्यालया समोर मागण्या पूर्ण होत नसल्याने ठाम मांडून  बसले होते.

Popular posts from this blog