शेकाप नगरसेविका ममता थोरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगांव येथे मोफत आरोग्य शिबीर

माणगांव : प्रमोद जाधव

माणगांव नगरपंचायत च्या कार्यक्षम नगरसेविका कु ममतादीदी थोरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगांव शहरातील प्रभाग क्रं ४ उतेखोल गाव सामाजिक सभागृह येथे २५ जून रोजी नामांकित संस्था JSW संजीवनी हॉस्पिटल व शेकाप युवा नेते निलेश थोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निष्णात डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले व शासनाच्या विविध योजनांचे मोफत कार्डवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन माणगांव नगरपंचायत चे प्रथम माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव,संदीप खरंगटे, रत्नाकर उभारे, नगरसेविका हर्षदा काळे, शेकाप नेते माजी सरपंच अनंता थळकर, महेश सुर्वे, बाळकृष्ण आंबूर्ले, नामदेव शिंदे यांच्यासह उतेखोल गाव ग्रामस्थ महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते. माणगांव तालुक्यातील सुमारे ३०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या आरोग्य शिबिरामध्ये त्वचेचे आजार, महिलांचे आजार,वृद्धांच्या समस्या आदी आजारांची तपासणी करून त्यावर उपचार करण्यात आले, तसेच नागरिकांना आवश्यक असणाऱ्या शासकीय योजना संदर्भात विविध कार्ड देखील काढून देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी माणगांव तालुक्यातील शेकापचे ज्येष्ठ मान्यवर, JSW संजीवनी हॉस्पिटलचे डॉ श्रध्दा शिंदे, डॉ  धुळेश, डॉ सोनाली थळे (ENT), मोनिका पाटील(Dental), तेजस्वी पाटील व कर्मचारी फार्मासिस्ट आदर्श गिरी, विनित पाटील, सिध्दार्थ शिंदे, दिव्या आंद्रे, किर्तेश पाटील,अक्षय म्हात्रे,अशोक फटांगे, महादेव कटक यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच शेकाप युवानेते निलेश थोरे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिबीर व्यवस्थित पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

Popular posts from this blog