जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी कार्यकारिणीत फेरबदल
माणगांव तालुकाध्यक्षपदी संगिता बक्कम यांची पुन्हा निवड तर, जिल्हा संघटक सचिव पदी विशाखा यादव यांची नियुक्ती
माणगांव : प्रमोद जाधव
माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, रायगड जिल्हा महिला आघाडी च्या कार्यकारिणी मध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व जिल्हा महिला आघाडीच्या च्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
यामध्ये माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या तालुकाध्यक्षपदी संगिता बक्कम यांची पुनश्च निवड झाली आहे तर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी किशोरी हिरवे आणि यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच गोरेगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या अध्यक्षा विशाखा यादव यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी संघटक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या या नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र रायगड रत्नागिरी चे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते १७ जून रोजी देण्यात आले आहे.या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत पालकमंत्री नाम आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा उमा मुंढे,महिला प्रदेश सरचिटणीस दिपीका चिपळूणकर,पाली नगरपंचायत नगराध्यक्षा गीता पालरेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना खासदार सुनिल तटकरे, नाम.आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी नवनिर्वाचित महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पक्षाचे काम इमाने इतबारे करून पक्षाला नवी उमेद व नवी भरारी द्यावी अश्या सूचना केल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.