रोहा तालुका कुणबी समाज विभागीय ग्रुपची पुनर्बांधणी करणार - शिवराम शिंदे
रोहा : समीर बामुगडे
कुणबी समजोन्नोती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर जुन्या चाली रूढी परंपरा जोपासणारे एकमेव चणेरा विभाग कुणबी समाज आहे. त्यांचा आदर्श इतर विभागीय कुणबी समाज ग्रुपने घेतला पाहिजे याकरिता पुन्हा कुणबी समाज ग्रुपची पुनर्बांधणी करणार असल्याचे प्रतिपादन रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी केले.
कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहाची सभा कुणबी समाज नेते माजी.आ.पा.रा.सानप कुणबी भवन रोहा येथे आयोजित केलेल्या कार्यकरणी सभेप्रसंगी रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम शिंदे बोलत होते. यावेळी उपस्थित समाजनेते रामचंद्र जाधव, रोहा उपाध्यक्ष मारुती खांडेकर, ओबीसी संघर्ष समिती व जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, शंकरराव भगत, शिवराम महाबळे, दत्ताराम झोलगे, गोपीनाथ गंभे, रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, महेश ठाकूर, सुनिल ठाकूर, सुहास खरीवले, महेश बामुगडे, काशिनाथ भोईर, संदेश लोखडे, खेळु ढमाल, रामशेठ करंजे, विष्णु लोखंडे, यशवंत हळदे, दगडु बामुगडे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कुणबी समाजबांधव व कार्यकरणी सभासद उपस्थित होते. तर ओबीसी रायगड जिल्हा अध्मक्ष कुणबी समाज नेते सुरेश मगर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, ग्रामपंचायतीमध्ये जातनिहाय जनगणना सुरू आहेत तर प्रतेक समाज बधंवाने यावर लक्ष देऊन नोंदणी करु करून घ्यावी असे आवाहन यावेळी केले.
तर माझी मुबंई उपाध्यक्ष ज्येष्ठ समाज नेते रामचंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुंबई संघावर जास्तीत जास्त आजिव सभासंदांची नोंदणी करा. तसेच कुळ कायदा विषयाप्रमाणे आपल्या तालुक्यातील तक्रारी दाखल करुन गोर गरीब शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. तसेच शिवराम महाबले, शंकरराव भगत, दत्ताराम झोलगे, अंनत थिटे, महेश ठाकुर यांनी देखील समाजाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.