द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड यांच्या बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
रोहा : सदानंद तांडेल
मार्च 2021 मध्ये झालेल्या 12 वीच्या परीक्षेमध्ये द. ग. तटकरे विद्यालय कोलाड या विद्यालयाचा निकाल अतिशय चांगला लागला आहे. यामध्ये शास्त्र विभाग, वाणिज्य विभाग,कला विभाग व एमसीव्हीसी या सर्व शाखांचा निकाल अपेक्षा पेक्षा चांगला लागला आहे विशेष म्हणजे शास्त्र शाखेची विद्यार्थिनी कुमारी अस्मि किशोर पोळेकर ही 86.17 एवढे गुण घेऊन रोहा तालुक्यात प्रथम आलेली आहे. तीच्या या यशाबद्दल रोहा तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्यालयाच्या शास्त्र शाखेचा निकाल 98.48 एवढा लागला आहे.या विभागातून कु. अस्मि किशोर पोळेकर 86.17, कु. श्रेया अनिल दराडे 83.17, कु. समीक्षा चंद्रशेखर पाटील 81 हे विद्यार्थी चांगले गुण मिळवून यशाचे मानकरी ठरले आहेत. तसेच कॉमर्स इंग्लिश मीडियम या विभागातून कु. गौरव संतोष यादव 85.66, कु. सई संजय शिंदे 85.16 कु. श्रेयस सदानंद गावडे 84.5 हे विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले आहेत तसेच एम सी व्ही सी या विभागातून कु. भावेश कुंदा राम सरफले 71.5, कु. प्रितेश वसंत उमासरे 69.83, कु. हरीओम किसन उमासरे 63.16
हे विद्यार्थी चांगले गुण मिळवून यशाचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, कार्याध्यक्षा सौ. गीताताई पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर, संचालक राजेंद्र पालवे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुरेश महाबळे, विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरुणकर, उपप्राचार्य शकील मोरवे, पर्यवेक्षक मारुती देशमुख या सर्वांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्यासाठी मेहनत घेणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालय नेहमीच यशाची परंपरा कायम राखेल अशी भावना पंचक्रोशीतील पालकांसमोर व्यक्त केली. विद्यालयाच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत पालकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे सर्वच स्तरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे या सर्वांनी विद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थ्यांवर मेहनत घेणारे शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.