ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

विनापरवाना खैर वाहतूक करणारा ट्रक रोहा वनविभागाने पकडला! 

आरोपीसह ६ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

रोहा : समीर बामुगडे

विनापरवाना खैर वाहतूक करणारा ट्रक रोहा वनविभागाने पकडला असून आरोपीसह ६ लाख २९ हजार १२९ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक रोहा श्री अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा श्री विकास रा.भामरे व स्टाफ श्री आर.जी.पाटील, वि.टी.ठाकूर वनपाल फिरते पथक रोहा, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, पोपट करांडे, वनरक्षक पळसगाव अक्षय मोरे यांनी दिनांक 20/06/2022 रोजी रात्री 00.34 वाजता मिळालेल्या गुप्त बातमीवरून माणगांव मुंबई-गोवा रस्त्यावर गस्त करीत असताना टाटा ट्रक क्रमांक MH41/G7330 ची  तपासणी केली असता खैर वृक्षाची अवैध वृक्षतोड करून तयार केलेला खैर सोलिव माल 14.000 घ.मी.किंमत 1,29,129/- व टाटा ट्रक क्रमांक MH41/G7330 अंदाजे किंमत  5,00,000/- विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व खैर सोलीव माल असा 6,29,129/-- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक मालक अफजल नजीर खान रा. भिवंडी, जिल्हा. ठाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog