पितृछत्र हरपलेल्या सूरज ठाकुर याने काढले प्रतिकूल परिस्थितीत 88.20 टक्के मार्क

भा.ए.सो.मध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी; विभागातून होत आहे कौतुक

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी. परमार विद्यालयातील सूरज अशोक ठाकूर या पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या बोर्ड परीक्षेत 88.20 % मार्क मिळवून विद्यालयात पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

सूरज याचे वडील अशोक ठाकुर यांचे साधारण दहा वर्षापूर्वी अपघाती निधन झाले. त्या वेळी सूरज हा जेमतेम 5/6 वर्षांचा होता. तेव्हापासून तो त्याची आई उषा व बहीण पूजा यांच्या समवेत त्याचे आजोबा प्यारेलाल ठाकुर व काका भरत ठाकुर यांच्यासमवेत राहतो. सूरज हा लहानपणापासून शांत स्वभावाचा व अभ्यासात हुशार होता.तो शाळेतून घरी आल्यानंतर आईला घरात तसेच आजोबा व काकांना आईसक्रीम बनविण्यासाठी मदत करायचा. सुरुवाती पासून अभ्यासात हुशार असलेला सूरजने अहोरात्र मन लावून अभ्यास केला. व दहावीच्या बोर्ड परीक्षेत 88.20 % मार्क मिळवून विद्यालयात पहिला येण्याचा मान मिळविला. त्याच्या या यशामध्ये विजया पवार मॅडम तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक- शिक्षिकेंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती त्याचे काका भरत ठाकूर यांनी दिली. प्रतिकूल परिस्थितीत 88.20 % मिळविणार्‍या सूरजचे विभागातून कौतुक व त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog