बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याने कोल्हापूरमध्ये पण अनेकांना लाखो रूपयांना लुबाडले!
या भामट्यापासून सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते!
कोल्हापूर : प्रतिनिधी
संजय पाडुरंग कदम नावाच्या बोगस पत्रकाराने मागील तीन वर्षांपासून सर्वत्र धुमाकूळ घातलेला असून रायगड आणि पुणे येथील लोकांना फसवून त्यानंतर त्याने कोल्हापूरमधील लोकांना देखील लाखो रूपयांना फसवून तेथून पळ काढल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलीसांकडे देखील तक्रार दाखल झालेली आहे.
बोगस पत्रकार संजय कदम हा तीन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातून अनेकांना लाखो रूपयांना लुबाडून फरार झालेला असून रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्यात या बोगस पत्रकाराविरूद्ध अनेक फसवणूकीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगांवमध्ये संजय कदम याने "पोलीस टाईम्स" च्या नावाने कार्यालय सुरू केले होते व अनेकांकडून दोन ते पाच हजार रूपये घेऊन त्यांना "पोलीस टाईम्स" या नावने बोगस प्रेस आयडी कार्ड दिले होते. त्यावेळी हे नवीन बोगस पत्रकार गळ्यात आयडी कार्ड टाकून अनेक ठिकाणी मोठ्या ऐटीत फिरताना दिसत होते व स्वतः मोठे पत्रकार असल्याच दिखावा करीत होते. दरम्यान, संजय कदम याने अनेक लोकांना भूलथापा मारून, नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून व पत्रकार असल्याची बतावणी करून व नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून काही लोकांकडून ५० हजार, तर काही लोकांकडून १ ते २ लाख रूपये असे लुबाडून माणगांव तालुक्यातून पनवेल येथे पळ काढला. त्यानंतर नवीन पनवेल मधील सेक्टर 15-A येथील आशिर्वाद सोसायटीमध्ये त्याने स्वतःचे ऑफीस (भाड्याने) सुरू केले. काही महिने तेथे राहून संजय कदम याने तेथील जागेच्या (ऑफीसच्या) मालकाला पण चांगलीच टोपी लावली व तेथूनही आर्थिक लुबाडणूक करून त्याने पळ काढला.
त्यानंतर बोगस पत्रकार संजय कदम याने पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी, पुणे-सोलापूर रोड येथे स्वततःचे बोगस ऑफीस थाटले! रायगड जिल्ह्यात त्याने ऑफीस सुरू करताना "पोलीस टाईम्स" या नावाचा वापर केला होता व पुणे येथे ऑफीस सुरू करताना "न्यूज २४ तास मराठी" च्या नावाचा वापर केल्याचे उघडकीस आलेले आहे. दरम्यान, स्वतःच तयार केलेले बोगस ओळखपत्र दाखवून जिल्ह्यातील मोठा पत्रकार असल्याचे भासवून संजय पांडुरंग कदम या बोगस पत्रकाराने अनेक लोकांना भूलथापा मारून, आमीष दाखवून त्यांची आर्थिक लुबाडणूक केल्याचे उघडकीस आलेले आहे. अशाच प्रकारे त्याने कोल्हापूरमध्ये देखील अनेकांना लाखो रूपयांना फसविले असून याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील उचगांव, ता. करवीर येथील सुकूमार आप्पासो भोसले यांनी तक्रार दाखल केली असून बोगस पत्रकार संजय कदम याचा पोलीस शोध घेत आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या नावाने व चॅनल्स च्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या या बोगस पत्रकारापासून नागरिकांनी सावध रहावे व दमदाटी अथवा पैशाची मागणी केल्यास थेट नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन "न्यूज २४ तास मराठी" चे मुख्य संपादक किशोर केणी यांनी केले आहे.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी "न्यूज २४ तास मराठी" चे पत्रकार कार्यरत आहेत, परंतु काही बोगस पत्रकार देखील "न्यूज २४ तास मराठी" चे आयडी कार्ड (बोगस कलर प्रिंट) तयार करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आलेले आहे. अशाच प्रकारे "न्यूज २४ तास मराठी" च्या नावाचा वापर करताना कुणीही बोगस पत्रकार आढळून आल्यास त्या पत्रकाराचे नाव व वर्णन... ई-मेल : news24taasmarathi@gmail.com या ऑफीशियल मेल वर मेसेज करून खात्री करून घ्यावी. त्यानंतर एका मिनीटातच तुम्हाला त्या पत्रकाराच्या सत्यतेविषयी माहिती मिळेल!