चोळे गांधे येथे अवैध रेती उपसा सुरूच, महसूल विभागाचे दुर्लक्ष!
रोहा : समीर बामुगडे
शिहू येथील आंबा नदी पात्रातून अवैध रेती उपसा राजरोस पणे सुरु असून बांध बंदिस्तीला धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. चोळे, गांधे येथील आंबा नदी पात्रातून गेली अनेक वर्षे रेती उपसा चालू असून भात शेती पूर्णपणे नापीक झाली आहे. कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता हजारो ब्रास रेती येथून काढली जात आहे. या वाळू माफियांवर कडक कारवाई करून आमची शेती वाचवावी अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचं येथील शेतकऱ्यांनी आपलं महानगर सोबत बोलताना सांगितले.
आमची शेती वाचवावी म्हणून आम्ही वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफि्यांचा विरोध केला व संबंधित येत्रंणेकडे तक्रार अर्ज केला, परंतु आमच्या अर्जाचा विचार न करता कोणतीही कारवाई केली नाही.
तुकाराम हाशा पाटील (स्थानिक शेतकरी, चोळे)