रायगड जिल्हात प्रथमच महिला रायगड प्रिमियर लिग
चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी
पहिल्या महिला रायगड प्रिमियर लिग स्पर्धेच्या पुर्व तयारी साठी रायगड मधिल होतकरु महिला खेळाडुंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव मिळावा, खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी, प्रथितयश खेळाडुंचा खेळ जवळुन अनुभवता यावा याहेतुने ठरविल्याप्रमाणे रायगड प्रिमियर लिग आयोजन समिती तर्फे आणखी २ सराव सामने आयोजीत करण्यात आले होते. हे सामने बेलापूर येथील सिडकोच्या भव्य मैदानावर खेळविण्यात आले. सामन्यांसाठी पालकवर्ग आणि प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिल्याने खेळाडुंच्या उत्साहात भर पडली होती मुंबई आणि नवी मुंबईतील नवोदित उभरत्या , नामांकित महिला तरुण खेळाडुंचा भरणा असलेल्या संघां बरोबर हे सामने दिनांक ४ जून २०२२ रोजी खेळविण्यात आले. रायगड प्रिमियर लिग तर्फे उपल्ब्ध असलेल्या खेळाडुं मधुन दोन संघ तयार करण्यात आले होते. प्रत्यक्ष दोन्ही सामने रायगडच्या संघांनी गमावले. मात्र या सामन्यांमधुन रायगडच्या खेळाडुंना मिळालेला अनुभवाचा फायदा पुढील कारकीर्द घडवीण्यासाठी लाख मोलाचा असेल यात शंका नाही.महिला प्रिमियर लिगची घोषणा करण्यात आल्या नंतर आयोजकांतर्फे महीलांचे संघ बांधणी करीता राबविलेल्या विविध उपक्रमांचा परीणाम या सामन्यांमध्ये पहायला मिळाला. मातब्बर संघाविरुद्ध सामना असुनही रायगडच्या लहान, छोट्या खेळाडुंचा मैदानावरील आत्मविश्वास पूर्ण वावर वाखाणण्याजोगा होता.तोंडावर आलेला पावसाळा आणि प्रिमियर लिग आयोजकांतर्फे करण्यात येणारे आणखी काही सामने, खेळातील आणखी बारकावे शिकणे आवश्यक असल्याने तुर्तास रायगड प्रिमियर लिग स्पर्धा काही कालावधी नंतर आयोजित करण्याचा बेत आयोजन समितीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.खेळाडुंचे पालक आणि स्पर्धेच्या समर्थकांनी आयोजकांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला असुन प्रिमियर लिगच्या विनामुल्य उपक्रमांची उपयुक्तता, आयोजनातील सुसुत्रता यामुळे खेळाडुंची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे आत्तापर्यंत खेळविण्यात आलेल्या सामन्यांमध्ये , शिबिरामध्ये पहायला मिळत असल्याचे मत या सामन्यानंतर पालकांनी व्यक्त केले. या सामन्यांच्या वेळी विशेष निमंत्रित पाहुणे तरुण उद्योजक व खेळाडु श्री. चेतन त्रिवेदी यांनी रायगड प्रिमियर लिगतर्फे जिल्ह्यातील महिला क्रिकेट साठी करण्यात येणाऱ्या विशेष प्रयत्नांचे कौतुक कले आणि नियोजित स्पर्धेला जास्तीत जास्त मदत करण्याचे जाहीर केले. आयोजकांतर्फे मैदान उपल्ब्ध करुन देणाऱ्या सिडको प्रशासनाचे आणि पालक वर्गाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले हे दोन्ही सामने आयोजीत करण्याकरिता अध्यक्ष श्री राजेश पाटील, सचिव श्री जयंत नाईक, श्री कौस्तुभ जोशी, श्री प्रदीप खलाटे, श्री सुरेन्द्र भातिकरे, श्री संदीप जोशी, श्री प्रितम पाटील, श्री हुसेन तांबोळी आणि पालक वर्गाने विशेष प्रयत्न केले.