निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रा.जि.प. खरवली आदिवासी वाडी शाळेच्या इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन
साई/माणगांव : हरेश मोरे
चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्हा परिषद खरवली आदिवासी वाडी शाळेच्या इमारती नूतनीकरणाचे उद्घाटन रविवार तारीख 12 जून रोजी दाते कमलेश मेहता परिवार व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शाळेचे निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळ विद्यार्थ्यांना शिक्षणात खूप मोठ्या समस्या येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन चंदुलाल सुखलाल मेहता चारिटीजचे कमलेश मेहता यांनी स्व देणगीतून अत्यंत सुंदर अशा इमारतीचे नूतनीकरण केले.
उद्घाटन समारंभप्रसंगी कमलेश मेहता यांचा पूर्ण परिवार पारूल मेहता,भावी मेहता, विनय मेहता तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय नागराथ, डॉक्टर मयूर जोगीदासानी, समीर जोगिदासानी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रावण कोळी, सामाजिक कार्यकर्ते चंदर जगताप,माजी सरपंच महादेव खडतर, विनोद लाड, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.अत्यंत सुंदर इमारत झाल्याबद्दल ग्रामस्थांनी कमलेश मेहता परिवाराचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित शेडगे यांनी केले प्रास्ताविक शिक्षिका अनघा शेडगे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका सीमा केंद्रे यांनी मानले. उत्साहपूर्ण वातावरणात निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्हा परिषद आदिवासी वाडी खरवली शाळेच्या इमारत नूतनीकरणाच्या उद्घाटन संपन्न झाले.