दिव्यांगाचा १३ जूनला माणगांव पं.स.वर धडक मोर्चा - राजेंद्र (आण्णा) पांचाळ 

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगाच्या हक्कासाठी व अन्यायाच्या विरोधात माणगांव तालुक्यातील दिव्यांगाना माणगांव पंचायात समिती मधील काही ग्रामपंचायत ५% निधी हा अपंगाना गेल्या अनेक वर्षे देण्याचे टाळा टाळ करत असल्यामुळे दि.सोमवार दि १३ जुन २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता दिव्यांगाचा धडक मोर्चा माणगांव पंचायत समितीवर धडकणार असल्याचे माणगांव तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र (आण्णा) पांचाळ यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले. तसेच त्यांनी बोलताना पुढे सांगितले की, माणगांव पंचायत समिती मधील काही ग्रामपंचायत अपंगाना ५% निधी देणे टाळा टाळ करत असून निधी देण्यासाठी जी एस टी बिळाची मागणी करी असतात तसेच को-या १०० रूपये स्टँपवर सही करून मागत असल्यामुळे काही ग्रामपंचायींमध्ये तर अपंगांसाठी निधीच शिल्लक नाही असे कारण सांगितले जात असून या बाबत माणगांव तालुका प.स.चे गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून सुध्दा त्यांनी या प्रहार अपंग क्रांती संघटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष न देता अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारे कार्यवाही केलेली नाही असे राजेंद्र (आण्णा) पांचाल यांनी शेवटी बोलता सांगितले असून या दिव्यांग धडक मोर्चाला प्रहार अपंग क्रांती संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनिल घनमोडे, रायगड जिल्हा कार्यध्यक्ष रविंद्र सांगले, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा कु.रमाताई चोगले, माणगांव तालुका उपाध्यक्ष नितेश मिरगुले, माणगांव तालुका सचिव अमोल पांगारे, माणगांव तालुका महिला अध्यक्षा रेश्मा मोरे, विभागीय अध्यक्ष सुहास गंभीर, इमरान जाळगांवकर, मगेश वाढवळ, विजय बागवे, संदिप खामगांवकर, नथुराम शिगवण, निखील सुतार, बाळू जाधव, सहादेव वडेकर, सिताराम शेलार,सिध्दी शेंपूडे, मिनाक्षी तांबे, पुजा मोने, वसंत बडे हे जिल्हाचे तसेच तालुक्याचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार असून माणगांव तालुक्यातील तमाम अपंग बाधवानी या धडक मोर्चाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सामील व्हावे असे आव्हान प्रहार अपंग क्रांती संघटना माणगांव तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. 

Popular posts from this blog