रायगड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना अन्न व सुरक्षे संदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण बंधनकारक 

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र या योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खाद्य पदार्थ विक्रेते व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासना तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण तसेच कोरोना प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन केले जाते. सर्व व्यावसायिकांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले असून सर्व व्यापारी व व्यवसायिकांनी महाराष्ट्र शासनाने ट्रेनिंग पार्टनर म्हणून नियुक्त केलेल्या फाँस्टेक कंपनीचे रायगड जिल्हा नोडल ऑफिसर विद्यानंद अधिकारी यांनी व्यापारी व व्यवसायिकांना शासनाच्या या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

रायगड जिल्हातील सर्व तालुक्यान मध्ये व्यवसायिकांचा या योजनेस उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून याच वेळी माणगाव तालुका पंचायत समितीचे उप सभापती सुजीत शिंदे रास्त भाव धान्य दुकानदार मौजे चांदोरे यांनी माणगांव हाँफिस मध्ये येऊ आपली आँनलाईन ट्रेनिंग नोंदणी पावती स्विकारली. 

केंद्र शासनाच्या या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्हा व ग्रामीण भागातील सर्व खाद्यपदार्थ विक्री करणारे शहरी व ग्रामीण भागातील व्यवसायिकांना हे प्रशिक्षण अनिवार्य असून सर्व जिल्हा फाँस्टेक कंपनीचे प्रतिनिधी हे दुकानदार व्यावसायिक यांना जाऊन माहिती देत आहेत व आँनलाईन ट्रेनिंग नोंदणी पावती, देत आहेत तसेच यामध्ये  हॉटेल व्यावसायिक, बेकरी, खानावळ, किराणा दुकानदार, फळ विक्रेते, चहा विक्रेते, वडापाव स्टॉल, पान टपरी, स्वीटमार्ट, डेरी, धान्य दुकानदार, आदीनसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याने जास्तीत जास्त व्यवसायिकांनी याचा लाभ आपल्या विभागात प्रतिनिधी आला तर घ्यावे असे आवाहन श्री. विद्यानंद अधिकारी यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

Popular posts from this blog