अनधिकृत बांधकामाकडे कोलाड पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष!

रोहा : समीर बामुगडे 

वरसे ग्रामपंचयतच्या हद्दीत शिवमंदिर आणि समर्थनगर परिसरातुन भुवनेश्ववर कालवा रोड वरुन जाणाऱ्या रस्त्याने अनधिकृत बांधकामे चालू असून सदर बांधकामाविरोधात परिसरातील लघु पाटबंधारे खात्याच्या मालकीच्या जागेत अनधिकृत साकव पुलाची कामे झालेली असून या साकव पुलाचे कामे करणारे बिल्डर यांना कोणत्या कागदपत्राच्या आधारे परवागी देण्यात आली ती या विभागातील शेतकरी वर्गाला व नागरिकांना जाहिर करुन सांगवे! भूनेश्ववर पासून निवी, तळाघर, बोरघर, लांढर, वाशी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरुन शालेय विद्यार्थी व प्रवासी वर्गाला अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील नागरिकांचा प्रश्न जटील झाला आहे. या कामाकडे लघु पाटबंधारे विभाग लक्ष कधी देणार? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे? अनधिकृत साकव पुलाची पाटबंधारे विभाग संबंधित व्यक्तीची चौकशी करेल का? असा प्रश्न नागरिक व तक्रारदार विचारीत आहेत. ह्या कामाची कारवाई तातडीने पाटबंधारे खाते करील का हा सुध्दा नागरिकांनी जाब संबंधित अधिकाऱ्याला केला आहे? तर कालव्याच्या दुरूस्तीच्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे असा प्रश्न विभागातील शेतकरी वर्गाला व त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना पडला आहे. त्यामुळे अशी अनेक कामे प्रलंबितच आहेत. या परिसरातील कालव्याच्या सर्व्हे करण्याची पुन्हा मागणी जोर धरत आहे.

तसेच भुवनेश्ववर कालवा साफ सफाई वरसे ग्रामंपचयत करते आणि ठेकदाराला बिल अदा करते. त्यात सुद्धा ग्रामपंचायत सांगते की, यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही, तो कालवा साफ सफाई करण्याचे काम पाटबंधारे विभागाचे असून ग्रामपंचात स्वतःच्या शेखीचा टेंभा मिरवते! या सगळ्या विषयावर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Popular posts from this blog