स्व. नारायण माया तांडेल यांच्या स्मरणार्थ डॉ. किर्ती सुरेश तांडेल यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

रोहा : समीर बामुगडे 

तांडेल परिवारा तर्फे रविवार दि.१९ जून २०२२रोजी स्व. नारायण माया तांडेल यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सायंकाळी ४ ते ७ पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद. या शिबिराचे आयोजन तांडेल परिवार व विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ कोलेटी यांनी केले.

यावेळी ८२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत. या हेतूने डॉ. किर्ती सुरेश तांडेल तसेच त्यांचे सहकारी हर्षदा तांडेल साहिल तांडेल यांनी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, ओसिक्सज लेवल, स्त्रियांचे आजार, मोफत औषधे वाटप करण्यात आले व योग्य ते मार्गदर्शन सुद्धा केले. 

यापूर्वी अनेक आरोग्य शिबिरे ग्रामीण भागात यशस्वीपणे घेऊन गरजूंना त्याचा लाभ मिळवून दिला. कोरोनामुळे दोन वर्षे शिबिर घेता आले नाही. दरम्यान, रविवारी झालेल्या मोफत आरोग्य शिबिराने अनेकांना दिलासा मिळाला.

Popular posts from this blog