दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा यांची ५ व्या मेक्रोस्कन प्रीमियर लीग स्पर्धेत यशस्वी कामगिरी

चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी

5 व्या मेक्रोस्कन प्रीमियर लीग स्पर्धा लोणावळा येथे प्रथमच 14 वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी दिवस-रात्र लेदर क्रिकेटचे सामने मास्टर क्रिकेट असोशियन लोणावळा यांच्यामार्फत 31 मे रोजी भरवण्यात आले होते. सदर सामन्याचे थेट प्रक्षेपण युट्युब लाईव्ह  करण्यात आले या स्पर्धेमध्ये चार संघांनी सहभाग नोंदवला होता दिशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा या संघाने प्रथमच लोणावळा येथे स्पर्धेला उतरवण्याचे निर्णय घेतला.  त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून प्रथमच हा संघ दिवस-रात्र सामने खेळण्यासाठी सज्ज झाला होता प्रथम सामन स्पोर्टी गो क्रिकेट अकॅडमी यांच्याविरुद्ध झाला त्यामध्ये दीशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा संघाने 16 धावांनी विजय संपादन केला या सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा दिशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा संघाचा खेळाडू ऋषिकेश पिंपळकर याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. 31 मे रोजी प्रथमच दिवस-रात्र पद्धतीने दुसरा सामना दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा विरुद्ध रेडियन क्रिकेट अकॅडमी पुणे यांच्यामध्ये झाला या सामन्यात दिशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा संघाने 74 धावांनी विजय प्राप्त केला या सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा तसेच शतकी खेळी करणारा दिशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा संघाचा अथर्व खांडेकर याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले 1 मे 2022 रोजी दिशा क्रिकेट अकॅडमी संघ विरुद्ध पाचोरी क्रिकेट अकॅडमी यांच्यात अटीतटीचा सामना झाला त्या सामन्यांमध्ये दीशा क्रिकेट अकॅडमी रोहा संघाला 3 चेंडू मध्ये 4  धावांची गरज असताना पार्थ म्हात्रे याने विजयी चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला या सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा अमित जोगडे याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले 5 वी मेक्रोस्कन स्कॅन प्रीमियर लीग या स्पर्धेतील अंतिम सामना दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा विरुद्ध रेडियन क्रिकेट अकॅडमी पुणे यांच्यामध्ये झाला या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना रेडियम क्रिकेट अकॅडमी पुणे यांनी 127 धावा बनवले नंतर दिशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा यांनी हा सामना 8 विकेट राखून जिंकला 5 मेक्रोस्कन प्रीमियर लीग स्पर्धा आपल्या नावावर करण्यात यशस्वी झाले.

 या सामन्यांमध्ये  71 धावांची आक्रमक व निर्णायक खेळी करणाऱ्या अथर्व खांडेकर याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. स्पर्धेमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट कर्णधार साठी दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा संघाचा कर्णधार स्मिथ म्हात्रे यांना गौरवण्यात आले या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा संघातील आर्यन बाईत त्याला गौरवण्यात आलं या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू व अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अथर्व खांडेकर यांचा मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभिजीत कदम सर व अलंकार सर यांनी अथक प्रयत्न  परिश्रम करून स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले व स्पर्धा यशस्वी केली तसेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाच्या खेळाडूंसाठी रंगीत ड्रेस उपलब्ध करून दिले त्यांचे रायगड जिल्ह्यातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे  दिशा क्रिकेट ॲकॅडमी चे अध्यक्ष सुरेंद्र भातीकरे व कोच महेंद्र भातीकरे यांनी आयोजकांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog