अहिल्यादेवी सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेकडून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 297 वी जयंती थळ येथे उत्साहात साजरी
चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी
आमदार महेंद्र दळवी व मानसीताई दळवी, सरपंच सुनील पत्रे, संजय कचरे रा जि प सदस्य, आर सी एफ जीएम खाडिलकर, वाझे व अधिकारी वर्ग, डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दत्त टेकडी थळ येथे मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी धनगरी ओव्या, पालखी मिरवणूक सोहळा, भोजन, हळदी कुंकू कार्यक्रम, श्री बिभीषणकुमार गदादे पुणे यांचे व्याख्यान आदी कार्यक्रम सादर करण्यात आले.
याप्रसंगी प्रकाश बुरुंगले अनिल अर्जुन, नाना सातपुते तसेच सर्व माथाडी कामगार आरसीएफ उपस्थित होते.