काकल ग्रामपंचायत येथे महापंचायत राज अभियान
साई/माणगांव : हरेश मोरे
माणगांव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काकल येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पंचायत समिती माणगांव व ग्रुप ग्रामपंचायत काकल यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियान 26 जून रोजी ग्रुप ग्रामपंचायत काकल येथील कार्यालयात राबविण्यात आले. या अभियान कार्यक्रमासाठी काकल ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल हिलम, उपसरपंच श्रीकांत जाधव, ग्रामसेवक मंगेश चांदोरकर, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मोरे, माजी उपसरपंच बळीराम लाड, गणेश गायकवाड, अनंत लाड,सदस्य जाधव, पांडुरंग जाधव, मनोज लाड, क्रांती म्हात्रे, ज्योत्स्ना गायकवाड, ग्राम परिवर्तक जगन्नाथ गायकवाड तसेच पंचक्रोशी मधील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या अभियानात वारस नोंदणी करणे, पती-पत्नी यांची संयुक्तपणे घरांना नाव लावणे, सन 2011 पूर्वीची अतिक्रमणे नियमानकुल करणे, ई -श्रम कार्ड काढणे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन नोंद करणे, जन धन योजना खाते उघडणे, प्रधानमंत्री उज्वला योजना, जॉब कार्ड काढणे, आयुष्यमान भारत योजना तसेच आधार कार्ड कॅम्प राबविणे. याबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.