साई ग्रामपंचायत येथे आदिवासी कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
साई/माणगांव : हरेश मोरे
माणगांव तालुक्यातील साई ग्रामपंचायत या ठिकाणी 11 जून रोजी साई आदिवासी वाडी, वांजलोशी आदिवासी वाडी, भोरकस आदिवासी वाडी,महादपोली आदिवासी वाडी येथील 124 कुटूंबांना साड्या, कपडे व अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
बोरिचा माळ येथील ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या माध्यमातून मुंबई येथील दानशूर भगवान पटेल, हंसा बेन, अरविंद पटेल यांच्या आर्थिक सहाय्यातून जिग्नेश पटेल व अतुल शाह यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले.
यावेळी त्यांच्याबरोबर लाड सर, गायकर मॅडम आणि साई ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.