विळे केंद्राचा 10 वी चा निकाल 100 टक्के!
विळे केंद्रातून टाटा विद्यालय भिरा शाळेचा कु. अथर्व किशोर चिंचोळे 90 टक्के गुण मिळवून विळे केंद्रात पहिला
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील विळे केंद्रातून मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी च्या परीक्षेला हिरालाल मेथा माध्यमिक विद्यालय विळे, टाटा विद्यालय भिरा, कुंडलिका विद्यालय भिरा व आदर्श माध्यमिक विद्यालय आंबिवली कुडली या चार शाळांचे विद्यार्थी परीक्षेला बसतात.
यावर्षी चारही शाळांचे निकाल 100 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विळे केंद्रातून टाटा विद्यालय भिरा शाळेचा कु. अथर्व किशोर चिंचोळे हा विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवून केंद्रात पहिला आला आहे. चारही शाळांचे निकाल व पहिले तीन विद्यार्थी
हिरालाल मेथा माध्यमिक विद्यालय विळे येथील परीक्षेला एकूण 22 विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी सर्व विद्यार्थी पास होऊन शाळेचा निकाल 100टक्के लागला.
कु. रोहिणी अमित रानवडे 86.60टक्के गुण व कु. सुप्रिया सुरेश जाधव 86.60टक्के गुण मिळाल्याने दोघी शाळेतून प्रथम, कु. सायली मंगेश मालुसरे 86.20 टक्के मिळवून द्वितीय व कुमारी तन्वी योगीराज ढवण 84.20टक्के गुण मिळवून तृतीय. टाटा विद्यालय भिरा शाळेतून 23विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व पास. शाळेचा निकाल 100 टक्के लागला.
प्रथम तीन विद्यार्थी. अनुक्रमे कु.अथर्व किशोर चिंचोळे 90टक्के गुण प्रथम, कु. वेदांत अनिल सपकाळ 88.20टक्के गुण द्वितीय, कु. प्रज्वल किशोर महाजन 87टक्के गुण तृतीय.
कुंडलिका विद्यालय पाटणूस शाळेतून 7 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी सर्वच विद्यार्थी पास झाले. शाळेचा निकाल 100टक्के लागला.
प्रथम तीन विद्यार्थी अनुक्रमे कु. आदित्य अभिमान मोराळे 87टक्के गुण प्रथम, कु. गीता बबन बावधाने 75.40टक्के गुण द्वितीय, कु. अर्जुन बबन बावधाने 68.80टक्के गुण तुतीय. आदर्श माध्यमिक विद्यालय आंबिवली, कुडली शाळेतून 13 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी सर्व पास. शाळेचा निकाल 100टक्के लागला. प्रथम तीन विद्यार्थी अनुक्रमे कुमारी कशिश हशीराम म्हस्कर 86.60 टक्के गुण प्रथम, कु. उपासना मनोहर यादव 85 टक्के गुण द्वितीय, कु. अपर्णा सुनील पडवळ 84.80 टक्के गुण तृतीय. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्थरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.