स्वराज्याची शिवगुढी उभारुन केला शिवस्वराज्य दिन साजरा
नागोठणे : महेंद्र माने
06 जून रोजी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून येथील बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालयातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सोमवार 06 जून रोजी स्वराज्याची भागव्या ध्वजासह शिवगुढी उभारुन साजरी करण्यात आली. यावेळी सचिवालयाच्या समोर स्वराज्याची शिवगुढी उभारून तिचे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला उपसरपंच मोहन नागोठणेकर,ग्रा.पं. सदस्य- सुरेश जैन,अकलाक पानसरे,अतुल काळे,राजेश पिंपळे, ग्रा.पं. सदस्या- रंजना राऊत,कल्पना टेमकर,भक्ति जाधव,मिनाक्षी गोरे,माधवी महाडीक तसेच ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.