श्री जाखमाता क्रिकेट संघ वेलशेत प्रशांत स्मृती चषक, रायगड रोयल्स पेण व दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा पुरस्कृत T 25 स्पर्धा १९ वर्षा खालील स्पर्धेमध्ये पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघ विजयी
प्रतिनिधी : चंद्रशेखर सावंत
श्री जाखमाता क्रिकेट संघ वेलशेत आयोजित प्रशांत स्मृती चषक, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचा अन्तिम् सामना पनवेल् क्रिकेट स्पोर्ट्स ॲकॅडमी विरुद्ध दिशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा यांच्यामध्ये झाला. पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघाने अंतिम सामना पाच गडी राखून जिंकला. अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून उमर खान पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी याला गौरवण्यात आलं, स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून आर्यन चव्हाण पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी याला गौरवण्यात आले. स्पर्धे मधील उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई भिलारे फायटर क्रिकेट अकॅडमी माणगांव याला गौरवण्यात आले, स्पर्धे मधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोशन तायडे फायटर क्रिकेट अकॅडमी माणगाव याला गौरवण्यात आले या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक फायटर क्रिकेट अकॅडमी माणगांव यांनी पटकावला तर चौथा क्रमांक नागोठणे क्रिकेट संघ यांनी पटकावला.