श्री प्रभु विश्वकर्मा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन साजरा
प्रतिनिधी : चंद्रशेखर सावंत
रोहा तालुक्यात दमखाडीमध्ये नदी संवर्धन च्या बाजूला श्री प्रभु विश्वकर्मा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. निसर्गरम्य अशा परिसरामध्ये मंदिराचे भूमिपूजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अनिकेत तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मार्गदर्शन करून सुतार, लोहार, पांचाळ समाजासाठी सभागृह बांधण्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच समाजाला आणि महिलांना संघटित होण्याचे आवाहन केले.
प्राणप्रतिष्ठा च्या वेळी विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगरसेवक मयुर दिवेकर, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, माजी नगरसेवक महेश कोलाटकर, दिलीप दीक्षित, रामचंद्र सुतार, भरत सातांबेकर, बाळाराम सुतार, निवास सातांबेकर, विजय नागावकर, महेश नागावकर, कुलदीप सुतार, नामदेव सुतार, सचिन सुतार, अर्चनाताई सुतार यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा तसेच वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.