श्री विठ्ठल-रखुमाई संयुक्त संत नामदेव व दत्त मंदिर तळाशेत इंदापूर येथे कलशारोहण सोहळा संपन्न

माणगाव : प्रमोद जाधव

श्री संत नामदेव शिंपी समाज तळाशेत-इंदापूरच्यावतीने शुक्रवार दि.२० मे २०२२ रोजी कलशारोहण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.या संपूर्ण मंदिराचा खर्च नामदेव शिंपी समाज तळाशेतचे उपाध्यक्ष, दानशूर व्यक्तीमत्व संजय (आप्पा) ढवळे यांनी केला आहे.यावेळी कार्यक्रमासाठी दक्षिण रायगड शिवसेनेचे प्रमुख अनिल नवगणे, रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे,ग्रुप ग्रामपंचायत तळाशेतच्या सरपंच रोशनी नवगणे, ग्रुप ग्रामपंचायत तळाशेतचे सदस्य नितीन घोणे,रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघाचे विश्वस्त तथा माजी तहसिलदार अनंत टमके, नामदेव शिंपी समाज माणगांवचे अध्यक्ष राकेश सुपेकर, खजिनदार स्वप्निल रेळेकर, तळा समाजबांधव विजय लिमकर, तळाशेत अध्यक्ष मेघनाथ सातपूते, उपाध्यक्ष संजय ढवळे, सचिव प्रमोद मिरजकर, खजिनदार संजय वंडकर, माजी अध्यक्ष प्रभाकर पतंगे, माजी उपाध्यक्ष विलास कारंजकर, माजी सचिव अशोक सातपूते व सर्व समाजबांधव भगिनी उपस्थित होते. 

सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री पूजा व होम-हवन हे विधी पार पडले तर सकाळी ११ते १२ वाजता संजय (आप्पा) ढवळे यांचे निवासस्थान ते गणेश मंदिर,श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर अशी वाजतगाजत ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर कळशारोहणाचा कार्यक्रम सांग्रसंगीत पार पडला.यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.प्रास्ताविकात इंदापूर अध्यक्ष मेघनाथ सातपूते यांनी मंदिराचे जिर्णोद्धार कार्याची पाश्वभूमी स्पष्ट करुन मंदिराचे वास्तूचा पूर्ण खर्च करणारे संजय ढवळे यांचे आभार मानून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री.पुरुषोत्तम मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की," संजय (आप्पा) ढवळे यांचे सहकार्यामुळेच या मंदिराची नेटकी व भव्य वास्तु उभी राहीली असून त्यांच्या दातृत्वाला सलाम करतो तसेच रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघालाही त्यांनी नामदेव शिंपी समाज भवनासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही ते लवकरच पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करुन समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.अनघा किरण केळूसकर यांनीही आपल्या मनोगतात परमपूज्य कलावती आईंच्या भजनासाठी मंदिर उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाजाचे आभार व्यक्त केले. यावेळी अशोक सातपूते यांचेही समयोचित भाषण झाले.

यावेळी उपस्थित भक्तांना तिर्थ-प्रसादाचे व अल्पोपहार म्हणून पुरी-भाजीचे वाटप करण्यात आले.सुञसंचालन व आभारप्रदर्शन हेमंत बारटक्के यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मेघनाथ सातपूते,उपाध्यक्ष संजय ढवळे,सचिव प्रमोद मिरजकर,खजिनदार संजय वंडकर,सदस्य सर्वश्री हेमंत बारटक्के,परमानंद कजबजे,राजेश कारंजकर,जितेंद्र ढवळे, सुधाकर क्षिरसागर, अश्विन सातपूते, निरंजन कळस, प्रसाद पतंगे, धनंजय ढवळे यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog