रोहा तालुक्यातील जय बजरंग रोहा संघाने कुमार गट निवड चाचणीला मारली बाजी

रोह्याचा विराज पाटील याची झाली रायगड जिल्हा कुमार गट संघात निवड 

चणेरा/रोहा : रोहित कडू

रायगड ही कबड्डीची पंढरी म्हटली जाते यातच म्हसोबा क्रिडा मंडळ धाकटे शहापूर अलिबाग आयोजित रायगड जिल्हा कुमार गट निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी दिनांक २६ व २७ एप्रिल २०२२  या दोन दिवसात मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाल्या. रायगड जिल्ह्यातील १२८ नामांकित संघानी सहभाग घेतला. 

या स्पर्धेत अंतिम सामना झाला तो जय हनुमान उचिर्डे विरुद्ध जय बजरंग रोहा या अटीतटीच्या सामन्यात जय बजरंग रोहा संघनी ४ गुणांनी  बाजी मारली. तसेच पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेकरीत  रायगड जिल्हा कुमार गट कबड्डी संघात जय बजरंग रोहा संघाचा अष्टपैलू खेळाडू कु. विराज पाटील याची निवड झाली आहे. विराज पाटील ह्याला रोहा तालुक्यातील सर्व कबड्डी प्रेमींनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Popular posts from this blog