माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या रायगड विभागाची प्रशिक्षण कार्यशाळा पेण येथे संपन्न
रोहा : किरण मोरे
दिनांक १५ जून २००५ रोजी माहितीचा अधिकार कायदा २००५ लागू करण्यात आला. तेव्हा पासून शासकीय कार्यालयातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली आहेत. यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे. यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. महासंघातील प्रत्येक सदस्याला माहिती अधिकाराचा अर्ज सादर करीत असताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. यासाठी संस्थेचे संस्थापक सुभाष बसवेकर सर कार्याध्यक्ष शेखर कोलतेसर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष रघुनाथ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील बोरगाव गावाजवळील गायकर फार्म हाऊस येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शनासाठी शिवराम पाटील. (जळगाव), डॉ सरोज पाटील (धुळे), अमरनाथ शेणकर,(कोल्हापूर), सुनील गुजर (पुणे) हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून श्री साईराम प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. तर मान्यवरांचे रायगड जिल्ह्याच्या वतीने शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांकडून अर्ज सादर करीत असताना घ्यावयाची काळजी. तसेच ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, नगरपालिका, पोलीस स्टेशन, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयात होणारा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावेत. प्रथम अपील, द्वितीय अपील, तक्रार अर्ज सादर करणे तसेच माहिती अधिकार अधिनियम २००५ अधिनियम याबाबत मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना महासंघामार्फत प्रशस्तीपत्रक, बानेरमधील यशदाची पुस्तके देण्यात आली.
मान्यवरांचे व कार्यकर्ते यांचे आभार अमोद मुंडे यांनी केले.