रोहा चणेरा मार्गावर टेम्पो पलटी, सुदैवाने जीवीतहानी टळली!

चणेरा/रोहा : रोहित कडू

रोहा चणेरा मार्गावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवीतहानी झाली नाही, मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे.

रोहा चणेरा मार्गावर टेम्पो क्र.MH06.BW.4783 ही गाड़ी घेऊन रोहा मधील वरचा मोहल्ला येथील रहीम राजमोहमद बागवान हे भाजी सप्लाय करात असताना दिनांक 4 मे रोजी दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास रोहा कड़े जात असताना महादेवखार येथे त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला व गाड़ी पलटी झाली. या अपघातात सुदैवाने जीवीतहानी झाली नाही मात्र टेम्पो चालक किरकोल जखमी झाले. 

या मार्गावर यापूर्वी वाहनचालकांचा वाहनांवर ताबा सुटून अनेक अपघात घडलेले आहेत. जड, अवजड वाहन असो किंवा साधी वाहन असो चालक नेहमी भरधाव वेगाने वाहन हाकत असतात त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत असतात. सदरच्या मार्गावर आपघात दरम्यान अनेक बळी ही गेले आहेत. अनेकवेळा वळणांवर वाहने पलटी होऊन अपघात घडलेले आहेत. यावर मात्र कोणाचेही नियंत्रण नाही. चालकांचे वेग मर्यादेवर नियंत्रण नसल्याने या मार्गावर वेळोवेळी आपघात घडत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

Popular posts from this blog