चांदोरकर नावाचा कुणीही पत्रकार "न्यूज २४ तास मराठी" मध्ये कार्यरत नाही! 

या नावाचा माणूस पत्रकार असल्याचा दिखावा करीत असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी 

रोहा : प्रतिनिधी 

सध्या एका बोगस पत्रकाराने गाडीवर प्रेस बोर्ड लावून फिरण्यास सुरूवात केलेली असून त्याने अनेक ठिकाणी पोलीसांसमोर मोठ्या ऐटीत फिरून पत्रकार असल्याची बतवणी केलेली आहे. काही लोकांनी तर "न्यूज २४ तास मराठी" च्या संपादकांशी संपर्क साधून याबाबतची सत्यता पडताळून पाहिलेली आहे. त्यानंतर "न्यूज २४ तास मराठी" तर्फे याप्रकरणी सर्व नागरिकांना या बोगस पत्रकारापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. 

"न्यूज २४ तास मराठी" हे घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे नोंदणीकृत वेब न्यूज पोर्टल असून काही बोगस पत्रकार "न्यूज २४ तास मराठी" च्या नावाचा गैरवापर करीत असल्याचे उघडकीस आलेले आहे. दरम्यान, असाच प्रकार चांदोरकर नावाच्या एका बोगस पत्रकाराने देखील केल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामुळे सर्व पोलीस स्टेशन्स, शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, चांदोरकर नावाचा कुणीही पत्रकार "न्यूज २४ तास मराठी" मध्ये कार्यरत नाही. या नावाच्या माणसाने पत्रकार असल्याची बतावणी केल्यास व या बोगस पत्रकारामुळे कुणाचेही नुकसान झाल्यास "न्यूज २४ तास मराठी" जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी!


Popular posts from this blog