रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच रायगड प्रीमियम लीग तर्फे मुलींची निवड चाचणी
प्रतिनिधी : चंद्रशेखर सावंत
रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच रायगड प्रीमियर लीग तर्फे मुलींची क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 10 मे 2022 रोजी मुलींची निवड प्रक्रिया एम डी न फ्युचर स्कूल कोलाड येथे संपन्न झाली. उद्घाटनाच्या वेळी रायगड प्रीमियर लीग चे अध्यक्ष राजेश पाटील सर, सचिव जयंत नाईक, देवेंद्र चांदगावकर सर यांच्या हस्ते करण्यात आले या निवड चाचणीसाठी रायगड जिल्ह्यातून 45 मुलींनी सहभाग घेतला होता. निवड समिती नेमण्यात आली होती.
निवड समितीचे सदस्य म्हणून सागर सावंत, उमाशंकर सरकार, संदीप जोशी, महेंद्र भातीकरे यांची नेमणूक करण्यात आली त्यांनी निवड प्रक्रिया पार पाडली, नंतर राजेश पाटील यांनी मुलींना क्रिकेट मधील भविष्य संदर्भात मार्गदर्शन केले त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी मुलींच्या भविष्यासाठी सर्व प्रयत्न करणार असे सांगितले मुलींच्या निवड प्रक्रियेमध्ये चार टीम बनवण्यात आल्या निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी रायगड प्रीमियर लीग चे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, संदीप जोशी, महेंद्र भातीकरे, सुरेंद्र भातीकरे, चंद्रशेखर सावंत, शंकर दळवी सर, ऋषिकेश कर्णुक, मयूर पडवळ यांनी प्रचंड मेहनत करून निवड प्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये हातभार लावला.