पेणमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

खारपाडा : सुरेश तांडेल

छावा क्रांतिवीर सेना, पेण तालुका यांच्या वतीने पेण शहरातील चिंचपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिमाखात पार पडली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराज चौकातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शिवाजी चौक, आंबेडकर चौक, एस टी स्टँड, रायगड बाजार ते नवीन चिंचपाडा रोड वरून चिंचपाडा शांतिनिकेतन सोसायटी समोर बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमास आमदार श्री रविशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारापुरे, माजी नगरसेवक जितू म्हात्रे, नगरसेवक समीर म्हात्रे, ह भ प रामकृष्ण महाराज, रोशन पवार रायगड जिल्हा अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना, स्वप्नील घरत संपर्क प्रमुख, राजेश रसाळ संघटक रायगड जिल्हा उपस्थित होते. छावा क्रांतिवीर सेनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष आदित्य वाघ, खालापूर तालुका अध्यक्ष सचिन भालेराव, अलिबाग तालुका अध्यक्ष महेश घरत, अलिबाग महिला अध्यक्षा प्राजक्ता थळे, कार्याध्यक्ष राजेश मोकल, उरण तालुका अध्यक्ष अभिजित मोकल व सर्व छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या जयंती निमित्ताने शांतिनिकेतन सोसायटी समोर होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून उपस्थित सर्व पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमानिमित्त रायगड भूषण बाल शाहीर अथर्व पाटील यांचा पोवाडा तर श्री संजय ठाकूर व्याख्यान यांनी वातावरण मंत्रमुग्ध झालं. संभाजी महाराजांच्या 366 व्या जयंती निमित्ताने तालुक्यातील कार्यतत्पर सामाजिक मंडळ, संघटना यांचे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात मनसे नेते संदीप पाटील यांनी छावा क्रांतिवीर सेनेच्या पुढाकाराने कौतुक केलं. आमदार रविशेठ पाटील यांनी चौक भव्य दिव्य उभा करण्याप्रती तत्पर राहण्याचे आश्वासन दिलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री पी एल ठाकूर सर यांनी केलं तर आभार संघतानेचे संघटक राजेश रसाळ यांनी केलं.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पेण तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष नरेश म्हात्रे, तालुका सचिव दिलीप माळी,  पेन शहर अध्यक्ष दीपक संसारे, सल्लागार दिलीप साळवी, अनिल दरेकर, राम ठाकूर, विभागीय अध्यक्ष समाधान म्हात्रे, राजू ठाकूर, अंकुश वाघमारे, संजय पवार, किशोर चाळके यांनी अथक मेहनत घेतली.

Popular posts from this blog