तळा शहरात अवैध मटका राजरोसपणे सुरु, तातडीने कारवाईची मागणी
रोहा : समीर बामुगडे
तळा तालुक्यात बस स्थानकाच्या परिसरात मटका राजरोसपणे सुरु असून अनेक तरुण या मटका-जुगाराच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्थ होण्याच्या मार्गवर आलेले आहेत.
तळा शहरात मच्छी मार्केटच्या जवळ बाजूला बेकायदा मटका व्यवसाय तेजीत असून पोलीस याकडे जाणीवपूर्वक करीत करीत असल्याचे दिसत आहे. तरी या मटका व्यवसायिकांवर कडक कारवाई करून या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाकडून केली जात आहे.