राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छीमार सेल रोहा तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोळी यांची नियुक्ती
नवी मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छीमार सेल रोहा तालुक्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहा तालुका कार्यकर्ते
तथा सम्यक सामाजिक संस्था बेणसे चे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर धर्माजी कोळी रा.भागीरथीखार ता. रोहा,जि.रायगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कु. अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वर कोळी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे मच्छिमार सेल चे अध्यक्ष चंदू दादू पाटील, भावना घाणेकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पनवेल निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्राताई देशमुख, पनवेल विधानसभा महिला अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष श्री.नामदेव भगत, रायगड जिल्हा अध्यक्ष मंगेश कोळी,पेण तालुका अध्यक्ष बीपीन पाटील यांच्या उपस्थिती मध्ये ज्ञानेश्वर कोळी यांना नियुक्त पत्र देण्यात आले याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक तथा उद्योजक राजाराम जोशी, सम्यक सामाजिक संस्था. बेणसे रजि.महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग अडसुळे, अमित अडसुळे, आदिनाथ अडसुळे, उदोजक पृथ्वीराज जोशी, प्रियांक जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आपले मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर कोळी म्हणाले की, रोहा तालुक्यातील कोळी बांधवांच्या अनेक समस्या असुन रायगडचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, विधान परिषद आमदार भाई अनिकेत तटकरे साहेब यांच्या मार्फत शासन दरबारी मांडून कोळी बांधवाना न्याय मिळवून देण्याचा प्रमाणीक प्रयत्न करीन असे कोळी यांनी सांगितले. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावेन ज्ञानेश्वर कोळी यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.