सर्व दानांमध्ये विद्यादान हे सर्व श्रेष्ठदान – ह.भ.प. मधुकर महाराज जवके

नागोठणे : महेंद्र माने 

रोहा तालुक्यातील आमडोशी येथील विठ्ठल मंदिरात श्री माऊली कृपा ध्यान धारणा केंद्राच्या वतीने गुरुवार 26 मे रोजी एकादशीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या श्लोक पठण, हरिपाठ व विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाच्या वेळी केंद्राचे संस्थापक तथा वारकरी परिषद जिल्हाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज जवके यांनी सर्व दानांमध्ये विद्यादान हे सर्व श्रेष्ठदान असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला केंद्राचे उपाध्यक्ष नामदेव भोसले,सचिव भरत कामथे, उपसचिव कुलदीप जांभेकर,खजिनदार रविंद जांभेकर, सहखजिनदार मंगेश जाधव, संघटक संजय  कामथे, प्रविण जांबेकर, रामदास गुरुजी यांच्यासह अनिता भोसले, रत्नमाला जांबेकर, सुनीता जाधव, साधना जाधव,साधूराम कामथे, पांडुरंग कामथे, विठ्ठल जांभेकर, मिनाक्षी जांबेकर, सिताराम टके, हरीभाऊ कामथे, गणेश जाधव, रविंद्र मनवे, दत्ता शेडगे,आत्माराम जांभेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.   

गेली 22 वर्षे श्री माऊली कृपा ध्यान धारणा केंद्रामार्फत आध्यात्म, आरोग्य व शिक्षण ही तीन तत्व घेऊन साधकांना विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे केंद्राचे संस्थापक मधुकर महाराज जवके यांनी उपस्थित भाविकांना सांगितले की,संतानी समाज्यासाठी ग्रंथ निर्माण केले, गाथा निर्माण केली. समाजातील अंधश्रद्धा जावून समाज्यातील प्रत्येक घटक सज्ञान व्हावा व आपले जीवन व्यवस्थित जगावे यासाठी माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ सारखा ग्रंथ निर्माण केला असून सर्वच साधू-संतांना हे वाटणे अपेक्षीत आहे म्हणुनच त्यांनी ग्रंथाच्या गाथ्याच्याही पुढे जावून अगदी सोप्या भाषेत भुक लागलेल्याला अन्न दयावे, तहान लागलेल्याला पाणी दयावे व  जो अज्ञानी आहे त्या ज्ञान देवून सज्ञान करावे तीन तत्व समाज्याच्या कल्याणासाठी ठेवली आहेत व हीच तीन तत्व घेवून आम्ही केंद्रामार्फत कार्य करत आहोत.तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या दुनियेतून बाहेर यावे यासाठी त्यांना आम्ही श्लोक पठण करायला सांगत असून सर्व दानांमध्ये विद्यादान हे सर्व श्रेष्ठदान असल्याचे मधुकर महाराज यांनी सांगितले. यावेळी हरिपाठ, विद्यार्थ्यांना वह्या वाटप व श्लोकांचे पठण करून घेण्यात आले. उपस्थितांचे आभार भरत कामथे यांनी मानले.

Popular posts from this blog