विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची अलिबागमध्ये विविध विषयांवर बैठक

चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी

विधान परिषद सदस्य उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची आज रायगड दौऱ्या निमित्ताने अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे वेगवेगळ्या विषयांवर बैठक पार पडली. यावेळी प्रमुखांनी महाड, रोहा या ठिकाणी उद्भवणारी पुर परिस्थिती महाड तालुक्यात गेल्या वर्षी झालेला महापुर, त्यावरील उपाययोजना, दरड ग्रस्त गावांची माहिती, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या आई किंवा वडिल यांच्या साठी येणारे अनुदान, सध्या कोव्हीड रुग्णांची रायगड जिल्ह्यात असलेली रुग्ण संख्या याचा आढावा महिलांसाठी बचत गट, महिलांसाठी व्यवसाय नोकरी ची संधी त्यासाठी लागणारे साधन सामुग्री शिक्षण प्रशिक्षण या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकार, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर रायगड संपर्क संघटिका शितल म्हात्रे, महिला रायगड जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, रायगड जिल्हा युवा सेना अधिकारी सायली सदावर्ते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog