राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून २५ मे रोजी भारत बंदचे आवाहन
वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव
राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तथा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या २५ मे,२०२२ च्या भारत बंदला सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे २५ मे,२०२२ चाभारत बंद कशासाठी ? भारत बंद दहा मुद्यांवर केला जाणार आहे.
१)जातनिहाय जनगणना न करण्याच्या विरोधात आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याच्या समर्थनात २) इव्हिएम घोटाळ्याच्या विरोधात ३) खाजगिकरणात एससी,एसटी,ओबीसी आरक्षण लागू व्हावे म्हणून ४) शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा व्हावा म्हणून ५) सीएए/एनआरसी/ एनपीआर कायद्याच्या विरोधात ६) मध्यप्रदेश आणि ओडीसा मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणात स्वतंत्र मतदारसंघ लागू व्हावे म्हणून ७) पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींच्या विस्थापनाच्या विरोधात. ८) जबरदस्ती लसीकरणाच्या विरोधात. ९) लॉकडाऊन मध्ये कामगारांच्या विरोधात जे कामगार विरोधी कायदे केले गेले त्या विरोधात. १०) जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून. अशा मुद्यांना धरुन भारत बंद ची घोषणा चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष यांनी घोषणा केली आहे त्याला मा.वामन मेश्राम साहेब भारत मुक्ती मोर्चा नई दिल्ली यांनी जाहीर समर्थन दिले आहे .असंघटीत बांधकाम कामगार याचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष मिलिंद साळवी यांनी देखील जाहीर समर्थन दिले आहे बहुजन मुक्ती पार्टी युवा अध्यक्ष रायगड राकेश मोरे, संकेत कासारे भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र संदेश साळवी शशिकांत पवार बहुजन मुक्ती पार्टी रायगड अॕड. जयेश पवार इंडीयन लीगल प्रोफेशनल अससोसिएशन (इल्पा) महाराष्ट्र राज्य सदस्य यांनी देखील जाहीर समर्थन केले आहे या भारत बंदला सर्व सामाजिक जनतेने सवैधानिक पध्दतीने सहकार्य करावे असे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य महासचिव विजय आवासकर यांनी तमाम जनतेला आवाहन केले आहे.