इंदापुर येथे सर्व सेवा केंद्राचे सरपंच रोशनी नवगणे यांच्या हस्ते उदघाटन
वावेदिवाळी/इंदापुर : प्रतिनिधी
इंदापुर तळा रोड येथे कुंदन गौतम जाधव यांनी सर्व सेवा केंद्र घेतले असून त्याचे उदघाटन शुक्रवार दि.२० मे २०२२ रोजी सकाळी ११.०० वा तळाशेत इंदापुरच्या सरपंच रोशनी नवगणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. असता यावेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,माणगांव तालुका भाजपचे अध्यक्ष संजय (आप्पा) ढवळे, उद्योजक विद्यानंदजी अधिकारी, बाबा कांबळे, मेघनाथ सातपुते, डॉ. संजय सोनावणे, डॉ.आदेश घोणे, नितिन घोणे, संदेश मालोरे ,अविनाश मांडवकर, आकु बाळा खातु, आमोल पाटील, इंदापुर सविस गाव संबोध्दि विहार सभापती अंकुश सकपाळ, राजेश कदम, संदेश कदम, शरद कदम, संतोष मोरे, राजू कासारे, विलास शिंदे, दादा ढवळे, रायगड प्रेस क्लबचे सहसचिव पदमाकर उभारे, माणगांव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, तिसे ग्रामपंचायत सरपंच राकेश कांबळे, बंड्या कांबळे, विळे विभागातील युवा कार्यकर्ते रूपेश कांबळे, इंदापुर विभागातील ज्येष्ठ सामाजिक नेते नामदेव राव, कृष्णा राव, प्रबुध्द जाधव, शुक्रदास मोरे, राजू आयरे, यावेळी उपस्थित होते. तळारोड येथे या सर्व केंद्रातून आता सर्व सामान्य व्यक्तीला सर्व प्रकारचे शासकीय दाखले तसेच सर्व प्रकारचे गँझेट,तसेच तालुका कृषी, पचायत समिती, जिल्हा परिषद यांची सर्व शासकीय योजनेची माहिती देऊन अर्ज देखील मिळतील. पॅनकार्ड,ई - श्रम कार्ड, उद्योग आधार,७/१२ काढून मिळेल.