दिघी ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांच्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष

गटारांच्या दुर्गंधीमुळे, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

रोहा : किरण मोरे

ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय दिघी अंतर्गत दिघी कोळीवाडा येथे गटारांची संख्या जास्त असून बहुतांश गटारे बंदिस्त नाहीत. बहुतांश गटारे बंदिस्त नसल्यामुळे गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी गटारातून इतर ठिकाणी वाहत जाते. गटाराच्या दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच नगरिकंची ये-जा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय दिघी च्या नियोजनशुन्य आणि मनमानी कारभारामुळे दिघी गावातील नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पंचवार्षिक योजनेअंतर्गत वित्त आयोगामध्ये स्वच्छता व आरोग्याअंतर्गत स्वच्छतेसाठी व आरोग्यासाठी लाखो रुपयांची आर्थिक तरतूद होऊनही त्याचा नागरी सुविधांसाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे वापर होत नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली.दिघी गावातील नागरिकांनी याबाबत गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी येथे अनेकवेळा तोंडी विनंतीसह लेखी विनंती तथा निवेदन देऊनही संबंधित जबाबदार कर्मचारी/अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेकडून नागरी समस्यांवर प्रभावी अंमलबजावणीसह नियोजन करण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय दिघी अंतर्गत गावांमध्ये स्थानिक नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही नागरी समस्यांचे प्रभावी निराकरण होत नसल्याने तसेच निराकरण करण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याने सबंधितांना आम्ही केवळ खुर्च्या उबवण्यासाठी  निवडून दिले नसल्याची संतापजनक प्रतिक्रीया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. पंचवार्षिक योजनेअंतर्गत वित्त आयोगामध्ये विकासकामांसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद आणि विकासकामांवर करण्यात आलेल्या खर्चाशी संबंधित सर्व माहिती, दस्तावेज नागरिकांसाठी खुले, सार्वजनिक करण्यात यावेत तसेच संबंधित ठेकेदारांचीही माहिती सार्वजनिक करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

कोविड-१९ सदृश परिस्थितीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले आणि बेरोजगार झालेले नागरिक आरोग्यावर खर्च करण्यासाठी आर्थिक तजवीज कशी करणार? या द्विधा मनस्थितीत नागरिक अडकले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी द्वारे नागरिकांच्या सार्वजनिक समस्यांचे विहित मुदतीत निराकरण न केल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

माहिती अधिकार अर्ज दाखल करून तब्बल ४ वर्षानंतरही आणि माहिती आयुक्त,कोंकण खंडपीठ यांनी अर्जदारास निशुःल्क माहिती देण्याचे आदेश देऊन तब्बल २ वर्षानंतरही तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी, गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी यांचेकडून अद्यापपर्यंत अर्जदारास सार्वजनिक हिताची परिपूर्ण आणि सत्य माहिती दिली नसल्याने गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी च्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे.

 - श्री. परशुराम पायाजी पायकोळी

श्रीवर्धन तालुका अध्यक्ष-अन्याय, 

अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती, महाराष्ट्र राज्य

सदस्य - माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ,महाराष्ट्र राज्य

Popular posts from this blog