तळवडे येथे शेतजमीनीमध्ये बेकायदेशीर उत्खनन, महिलेची तक्रार 

तातडीने कारवाई करण्याची मागणी

रोहा : समीर बामुगडे 

रोहा तालुक्यातील तळवडे येथील शेतजमीनीमध्ये बेकायदेशीररित्या उत्खनन करून तेथील माती काढून नेल्याप्रकरणी मनिषा मोहन बांदल या महिलेने महसूल विभागाकडे व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.

अर्जदार सौ. मनिषा मोहन बांदल ह्या शेतकरी महिलेच्या मालकीची गट क्र.१६२ ही शेतजमीन मौजे तळवडे, ता. रोहा येथे असून सदर महिला या जमीनीत दरवर्षी भातशेतीचे उत्पन्न घेवून त्याद्वारे कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असून सदर शेतजमीन ही त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव आधार आहे. सदर महिलेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी शेतात राब भाजून शेतीची पावसाळापूर्व कामाची तयारी चालू केली होती. दरम्यान, सौ. मनिषा मोहन बांदल ही महिला कामानिमीत्त मुंबई येथे गेली असताना असताना दि. १६ मे २०२२ रोजी शेतजमीनीमध्ये कोणीतरी जे सी बी मशीन लावून शेतातील माती उत्खनन करून डंपरद्वारे नेत आहे, हे समजताच सौ. मनिषा बांदल ह्या दि. १७ मे २०२२ रोजी मुंबईहून गावी तळवडे येथे येऊन लगेचच तळवडे पोलीस पाटील शितल संतोष जाधव, अरूण कोंडे, लक्ष्मण बांदल, तुकाराम बांदल वगैरे यांना घेवून माझे शेतात जाऊन राब भाजलेल्या सुपीक जमीनीमध्ये मुजम्मील अहमद गिते, रा. खैरेखुर्द याने त्याचे विट भट्टीचे व्यवसायासाठी सदर जमीनीतून माती उत्खनन त्याचे कामगारांमार्फत करीत होता, मुजम्मील अहमद गिते याचे कामगार जे सी बी मशीन लावून शेतातील माती उत्खनन करून डंपर मध्ये भरून घेवून जात होते, तेव्हा सौ. मनिषा बांदल यांनी त्यांना थांबवून ही माझी शेत जमीन आहे, तुम्ही यात खोदकाम व उत्खनन करू नका असे सांगीतले, तेव्हा त्यांनी सांगीतले की, आम्ही आमचे शेठ मुजम्मील अहमद गिते यांच्या सांगण्यावरून या शेतजमीनीत उत्खनन करीत आहोत.

त्यानंतर दूसऱ्या दिवशी दि. १८ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान सौ. मनिषा बांदल ह्या त्यांचे दीर तुकाराम बांदल यांना सोबत घेऊन मुजम्मील अहमद गिते यांना भेटण्यास व जाब विचारणेसाठी खैरेखुर्द येथे निघाले असता तळवडे गावाच्या बाहेरील रस्त्यावर मुजम्मील अहमद गिते हे समोरून येताना भेटला तेव्हा त्यांना "तूम्ही माझे सुपिक भात शेत जमीनीमध्ये जे सी बी मशीन लावून शेतातील माती उत्खनन करून डंपर मध्ये भरून का घेवून जात होतात? तूम्ही आमची सुपिक जमीन का उध्वस्त केली?" असे विचारले असता, मुजम्मील अहमद गिते. हा मला उध्दटपणे उत्तर देत बोलला की “मला हवे तेथून मी माझ्या विट भट्टीसाठी माती घेवून जाईन, तूला काय करायचे ते कर मी कोणाचे बापाला घाबरत नाही, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही" असे बोलून तो तेथून निघून गेला. 

याप्रकरणी सौ. मनिषा मोहन बांदल यांनी महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Popular posts from this blog