महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा पेण तर्फे "दोस्ती विज्ञानाशी" शिबीर संपन्न
पेण : चंद्रशेखर सावंत
विज्ञान म्हणजे विचार करण्याची एक पद्धत फक्त! सतत प्रश्न विचारत , स्वतःच्या चुकांमधून शिकत शिकत पुढे जाते ते विज्ञान हाच वैज्ञानिक दृष्टिकोन शाळेतील मुलांमध्ये लहानपणापासून रुजावा ह्या उद्देशाने "दोस्ती विज्ञानाशी" हे शिबीर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा पेणने महात्मा गांधी वाचनालय येथे घेतले. 9 ते 15 ह्या वयोगटातील मुलांसाठी असलेल्या ह्या शिबिरात अनेक ज्ञानरंजक सत्रे होती. पोरे सरांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटउन पुढील सतराला सुरावत झाली. चमत्कारामगिल विज्ञान ह्या सत्रातून मुलांना भोंदूबाबा कसे हातचलाखी करतात याचे प्रात्यक्षिक संदेश गायकवाड यांनी दाखवले. विज्ञानगीते, बौद्धिक खेळ यांच्या माध्यमातून जगदीश डंगर यांनी मुलांना हसत-खेळत ठेवले व शिबिर उत्तम हातळले. चला जादुई दुनियेत या सत्रात साहील गायकवाडने धमाल आणली.
नामवन्त लेखकांच्या कथांचे अभिवाचन या माध्यमातून भुते, करणी इत्यादि अंधश्रद्धांबद्दल जागृती करण्यात आली. यात डॉ. प्रसाद गोडबोले आणि सावनी गोडबोले यांनी मुलांना चांगलंच खिळवून ठेवलं. मुलांनीच स्वयंस्फूर्तपणे केलेल्या पथनाट्यातून त्यांना हा विषय समजल्याने जाणवत होते. पेण तसेच आसपासच्या गावांमधील 50 मुलांनी शिबिराचा लाभ घेतला .
मुलांना शिबिरात प्रवेश हा विनामूल्य होता. या खर्चाची सर्व जबाबदारी प्राचार्य सतीश पोरे सरांनी उचलली होती.
मीना मोरे, सनय मोरे, एन. जे. पाटील, चंद्रहास पाटील, हेमंत म्हात्रे, गीता भानुशाली, हेमंत पाटील, संचिता गायकवाड अशा सर्वांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले.