रवाळजे कॅम्प शाळेने पुन्हा एकदा सिद्ध केली आपली गुणवत्ता
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
रा जि प शाळा रवाळजे कॅम्प शाळा तालुक्यापासून सर्वात लांब असलेली शाळा आहे. या शाळेने आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या BDS या स्पर्धा परीक्षेत रा जि प शाळा रवाळजे कॅम्प चे चार विद्यार्थी परीक्षेस बसले होते दिनांक २२/०४/२०२२ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात कु समर्थ बालाजी बेलुरे इयत्ता 3री याने 100 पैकी 94 गुण मिळवून गोल्ड मेडल मिळविले, कु आहिल अजमिर मुलाणी याने 100 पैकी 95 गुण मिळवून सिल्वर मेडल मिळविले, कु विराज विकास चव्हाण याने 100 पैकी 87 गुण मिळवून सिल्वर मेडल मिळविले तर कु कल्याणी किशोर येवले हिने 100 पैकी 84 गुण मिळवून सिल्वर मेडल मिळविले. चार विद्यार्थी सदर परीक्षेस बसलेले होते त्यापैकी चारही विद्यार्थ्यांना मेडल मिळाले असून त्यात एक गोल्ड तर तीन सिल्वर मेडल चा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून शिकतात आणि यावरून पुन्हा सिद्ध झाले आहे की मातृभाषेतून शिकत असलेली मुले स्पर्धा परीक्षेत आपले नाव लौकिक मिळवतात.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रवाळजे कॅम्प शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यातूनच शाळेने पुन्हा एकदा तालुक्यातील एक गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून आपलं नाव उज्वल केले आहे. गावात गुणवत्तापूर्ण शिक्षण असूनही गावातील काही मुले गावापासून दूर असलेल्या इंग्रजी माध्यमात जातात ही खंत शाळेचे मुख्याध्यापक श्री येवले सर यांनी व्यक्त केली; परंतु पुढील काही वर्षात गावातील सर्व मुले आपल्याच गावात शिकतील असा विश्वास शाळेतील दोन्ही शिक्षकांना वाटतो.
या परीक्षेत विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक श्री किशोर येवले सर व सहशिक्षिका श्रीमती परवीन शेख यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.