5 जून रोजी पनवेल येथे महासंघचे राज्य स्तरीय कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण कार्यशाळा

पनवेल : प्रतिनिधी

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेचे राज्य स्तरीय कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण कार्यशाळा येत्या पाच जून रोजी पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जवळपास दोन हजार  कार्यकर्ता उपस्थित  राहणार असल्याची माहिती महासंघचे  संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर आणि राज्य कार्याध्यक्ष शेखऱ कोलते  यांनी दिली.

माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य ही केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचा तत्वावर संघटित पध्दतीने कार्य व प्रसार प्रचार करणारी राज्यातील एकमेव संघटना म्हणून संपूर्ण देशात ओळखली जाते.  ही संस्था सन 2011 मध्ये स्थापित झाली असून आज राज्यात जवळपास पाच हजारच्या अधिक नोंदनीकृत सदस्य असलेली माहिती अधिकार कार्यकर्त्यांची ही राज्यव्यापी संघटना आहे . राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महासंघचे शेकडो प्रशिक्षित कार्यकर्ते सक्रियतेने कार्यरत आहेत.  पाच जुनला पनवेल येथे होणाऱ्या राज्य स्तरीय मेळावामध्ये कार्यकर्त्यांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संबंधी अर्ज व अपिल, तक्रार व पाठपुरावा,  दाखल होणारे खोटे गुन्हे पासून संरक्षण, विधी सेवा , प्रशिक्षित कार्यकर्ता, पत्रकार व समाजसेवक कशे बनावे , सेवा हमी कायदा, उच्च न्यायालयमध्ये याचीका दाखल करने , संघटनेचे कार्य व कर्तव्य या विषयांवर सुभाष बसवेकर आणि शेखऱ कोलते यांच्याद्वारे  मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या राज्य स्तरीय मेळावा व प्रशिक्षण कार्यशाळामध्ये राज्यातील इछुक सामाजिक कार्यकर्ता, वकील, शासकीय अधिकारी कमर्चारी,  विधी विद्यार्थी, पत्रकार, शिक्षक,  जागरूक नागरिक,  सामाजिक संस्था व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होवू शकतात. यासाठी 200 रुपये प्रवेश शुल्क असून नास्ता व जेवनाची  सोय करण्यात आली आहे .  प्रवेश व शुल्क विषयी अधिक माहितीसाठी सुभाष बसवेकर 9223516920, शेखर कोलते 7798388753, अब्राहम आढाव  9890242364 यांच्याशी संपर्क करता येईल.

Popular posts from this blog