पोलीस महासंचालक पदकाचे मानकरी पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत ठोंबरे सेवानिवृत्त

35 वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात केली निष्कलंक सेवा

नागोठणे : महेंद्र माने

पोलीस खात्यातील अलिबाग, रायगड येथील बॉम्ब शोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भगवान ठोंबरे हे शनिवार 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलीस खात्यात 35 वर्षे निष्कलंक सेवा देऊन निवृत्त झाले आहेत. त्यांचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,भेट वस्तु तसेच त्यांच्या पत्नी नीता ठोंबरे यांना साडी भेट देऊन सन्मान्त करण्यात आले. यावेळी सुभाष ठोंबरे,जयाराम पाटील,शुभम ठोंबरे,साहिल ठोंबरे यांच्यासह पोलीस खात्यातील मान्यवर तसेच ठोंबरे यांचे नातेवाईक उपस्थित होते. 

सन 1987  रोजी पोलीस दलात भरती झालेले सूर्यकांत ठोंबरे यांचे मूळ गाव अलिबाग तालुक्यातील मिळकतखार असून त्यांनी गेली 35 वर्षे विवीध पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल, ए.एस.आय.,पी.एस.आय. पदावर काम केले आहे. त्यांनी आपल्या सेवेतील कारकिर्दीत विवीध माध्यमातून 192 पारितोषिके  मिळवली असून त्यांना 2010 साली  मा. पोलीस महासंचालक यांच्या पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. ते शनिवार 30 एप्रिल रोजी अलिबाग येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलीस ठाणे येथून प्रभारी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

मला काम 35 वर्षे जनसेवा करण्याची संधी मिळाली असून त्यामध्ये मी निष्कलंक सेवा हेच सर्वात मोठे मला मिळालेले पारितोषिक समजतो. मी आता सेवानिवृत्तीमुळे पोलीस सेवेचा निरोप घेत असून नोकरी  करत असताना अनेक कठीण प्रसंग आले. त्यावेळी मला माझे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकाऱ्यांचे सहकार्य चांगल्या प्रकारे लाभले. त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी माझ्या सर्व वरिष्ठ, सहकारी व माझे सर्व कुटूंबीय तसेच मित्र परिवार यांचा अत्यंत आभारी व ॠणी असून आपले प्रेम,आस्था,आशीर्वाद,संपर्क सदैव बहरत जावो ही सदिच्छा व्यक्त करीत आहे.

 - सुर्यकांत ठोंबरे, पोलिस  उपनिरीक्षक

बॉम्ब शोधक व नाशक पथक, रायगड - अलिबाग

Popular posts from this blog